अमरावती | कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ; टोटल संख्या ८९
अमरावती, दि. 13 : जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याच एक महिला व चार पुरुषांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार
- अंबिकानगर परिसरातील 43 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
- लालखडी परिसरातील 65 वर्षीय पुरुष वक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
- बेलपुरा परिसरातील 30 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
- नांदगावपेठ परिसरातील 60 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वरील सर्व अहवाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त आहेत.
त्याचप्रमाणे, नागपूर येथील ध्रुव पॅथॉलॉजी व मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबतर्फे एक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात 49 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती परतवाडा येथील असल्याचे समजते.
ही प्राथमिक माहिती असून याबाबत अधिक तपशील मिळवण्यात येत आहे.