कोरोना संकट वर कर्तव्यदक्ष बजावणारा बंदपत्रित अधिपारीचारकांचाच मानधन कपात
प्रतिनिधि सचिन वैराळे :
आर्वी- सध्या चालु असलेल्या जागतिक माहामारीत कर्तव्य बजावत असलेले बंदपत्रित पारिकांचा वेतन कपात शासणाने केला आहे. सर्व बंधपत्रित अधिपरीचारिका महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र शासन आरोग्य संचालक मुंबई यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय प्रशिक्षण केंद्रातून यशस्वीपणे उत्तीर्ण झालेले बंधपत्र कर्मचारी त्यांच्यावर आज आणीबाणीची वेळ आलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारने बंद बद्री परिचारिकांच्या पगारामध्ये कपात केल्याचे दिसून आलेत त्यांच्या पूर्वीचे वेतन 45000/- हजार राहून आता कंत्राटी स्वरूपाचा मानधनात (25000/प-)पंचवीस हजार रुपये इतके देण्याचे ठरवले. सध्या covid-19 या विषानु विरुद्धचा लढ्यात सर्व बंधपत्रीत अधिपरिचारिका सेवा देत आहे.
यामध्ये बंधपत्र अधिपरिचारिका घरच्यांची स्वतःच्या फॅमिलीची परवा न करता सदैव covid-19 या साथीच्या रोगांमध्ये सेवा देत आहे. तरी सर्व पारिचारीकांनी जर बंद पुकारला तर पुढील परिस्थितिला पहाता शासनाला सामोरे जावे लागेल,असे पारीचारीक सेवक अमोल बुटले व चमु ग्रामिण रुग्णालय (कारंजा गा.) यांनी मा. आमदार दादारावजी केचे यांना निवेदनात नमुद केले आहे.