मृत महिलेचा दारू व्यवसाय ! ७ गावात नाकाबंदी तर आर्वीत भितेचे वातावरण


मृत महिलेचा दारू व्यवसाय ! ७ गावात नाकाबंदी तर आर्वीत भितेचे वातावरण 

प्रतिनिधी : मयूर वानखडे 

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता पुनः एक धक्कादायक बाब आणि चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे, सदर मृत महिलेचा दारूचा व्यवसाय असल्याने या महिलेच्या संपर्कात किती लोक आली याची चिंता परिसरातील नागरिकांना पडली आहे, 

सदर 35 वर्षीय महिलेचा  गावठी दारूचा मोठ्या प्रमाणात विक्रीचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांच्या अड्ड्यावर दररोज गर्दी असायची. अनेकदा मृतक नागपूर जिल्ह्यात दारू विकायला जात असत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

सदर महिलेने आर्वी येथील खासगी रुग्णालय नंतर शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय असा प्रवास केला आहे. त्यामुळे ह्या महिलेच्या संपर्कत कोण कोण आले याची माहिती प्रशासन घेत आहे. सोबतच या महिलेच्या अंत्यविधीत शेकडो लोक जमले असल्याची माहिती समोर येत आहे. 

त्यामुळे परिसरातील ३ किलोमीटर एरिया सील करण्यात आला असून कार्यवाही सुरू आहे. तर प्रशासनाने ११ व १२ मे  रोजी वर्धा जिल्हा जीवनावश्यक वगळता संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. 



Previous Post Next Post