वर्धा : सैनिकांचा दुचाकी अपघातात मृत्यू तर दोघे जखमी
कारंजा, ता. २० : शहरातील तिघे जण दुचाकीने शेतातुन परत येत असताना बिहाडी कारंजा मार्गावरील वळणावर आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला यात सैनिक रोशन बेलखडे याचा डोक्याला जबर मार लागला यात त्याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाला त्यांच्यावर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे .
मृतक सैनिक रोशन बेलखडे हा दिल्ली येथे भारतीय सैन्यात कार्यरत होता लॉकडाऊन लागण्यापूर्वी सुट्टीवर घरी आला होता त्यानंतर काही दिवसात लॉकडाऊन लागल्यामुळे त्याला ड्युटी जात आले नाही दोन महिण्यापासून घरीच असलायचे सांगण्यात आले रोशन बेलखडेच्या मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली.