"आर्वी अन्नछत्र" चे माध्यमातून 44 हज़ार चे वर घरपोच भोजन पार्सल वाटप

भोजन पार्सल वाटप ही आमच्याच कुटुंबियाची  सेवा - गौरव जाजू"

आर्वी अन्नछत्र" चे माध्यमातून 44 हज़ार घरपोच भोजन पार्सल वाटप


कोरोना वायरस कोविड 19 महामारी चे प्रादुर्भाव मुळे लॉक डाउन सुरु होताच आर्वी शहरातील व परिसरातील काम धंदे बंद पडलेत. दररोज कमावून दररोज खाण्याची सोय करणाऱ्या आपल्याच गरजु बंधुना आता विकट परिस्तिथि निर्माण झाली आहै हे समजताच आर्वी शहराला आपले कुटुंब समजून नेहमी सामाजिक कार्यात किवा कोणाचेही मदतीला नेहमी अहोरात्र धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यानी आपले मित्र परिवारासह 24 तास घरपोच भोजन पार्सल वाटप,आरोग्य सेवा,औषधि सेवा तात्काळ सुरु केले.

या घरपोच भोजन पार्सल वाटप उपक्रम "आर्वी अन्नछत्र" मध्ये सुरुवातीला स्वयंपाक घर सुरू करून आर्वी शाहरतील परिसरातील 1000 अत्यंत गरजु नागरिकांची शाहनिशा करून यादी तैयार केली व त्यांना सकाळी 500 व संध्याकाळी 500 या प्रमाणे दररोज 1000 भोजन पार्सल अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घरपोच पोहोचविन्यात आले.

 "आर्वी अन्नछत्र" दुसरे लॉक डाऊन झाल्यावर सुद्धा सुरूच आहे.

नंतर लवकरच हळू हळू उपरोक्त गरजु ची यादी वाढू लागली व त्यानंतर दररोज सकाळी 800 व संन्ध्याकाळी 800 चे वर अशे एकूण 1600 चे वर भोजन पार्सल वाटप घरपोच पोहिचविण्यात येतात.
या प्रमाणे आज पर्यन्त एकूण 44000 हज़ार चे वर या प्रचंड संख्येने भोजन पार्सल वाटप अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरपोच पोहोचविण्या आले. दुविधेच्या या वेळेस उपरोक्त भोजन पार्सल दररोज काम करून पोट भरणाऱ्या गरजुना लाख मोलाचे ठरलेले आहे.

लॉक डाउन वाढल्या मुळे अटी व शार्थि शिथिल होऊंन रोजगार सुरु होने पर्यन्त भोजन पार्सल वाटप उपक्रम "आर्वी अनछत्र" सुरूच राहणार असल्याचे प्रयत्न करणार असल्याचे गौरव जाजू यांनी आश्वस्त केले आहे.
या प्रचंड उपक्रमा करीता गौरव जाजू मित्र परिवाराचे दर्शन पुरोहित,गिरिराज राठी,मोहन छंगाणी,मोहित छंगाणी,चयन गहलोत, कृष्णा शर्मा,मोहित कट्टा, हितेश कट्टा,मंगेश जोशी,पवन ढोले,प्रवीण भूरके, गुड्डू दुधानी, विक्की रायकवार, सूरज माखीजा,गुड्डू ठाकुर,दिलीप राठी,अमन साहू,अशपाक अली,अर्पित खिलोसिया,आयुष पालीवाल,पीयूष पालीवाल,रमन अग्रवाल,निखिल अग्रवाल,छगन खिलोसिया, देवेश शर्मा,सावल ठाकूर,भूषण पुसदकर,सचिन वल्लभकर, सुनील वाघमारे,राहुल धवने इत्यादि सर्वानी अथांग परिश्रम केले.

या सतकार्यासाठी स्वइच्छेने ज्यानी ज्यानी सहकार्य केले त्या सर्वाचे गौरव जाजू यानी शत शा आभार मानले आहे.
कोविड 19 चे या महामारीच्या वेळेस जेथे काही लोक घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही तेथे स्वतःचे जीवाची पर्वा न करता अहोरात्र अथांग परिश्रम घेऊन भोजन पार्सल वाटप उपक्रम "आर्वी अन्नछत्र" चे माध्यमातून गरजू च्या घरोघरी जाऊन भोजन पार्सल पोहोचवून वाईट वेळी मदद केल्याने सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू  व मित्र परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या वाईट काळात भोजन पार्सल वाटप उपक्रम "आर्वी अन्नछत्र" ही मदद नाही तर आमच्या परिवारातील च  अतिशय गरजू कुटुंबियांची व बंधूंची सेवा आहे अशे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांनी केले आहे.
Previous Post Next Post