... हे शहर बनले विदर्भातील कोरोना हॉटस्पॉट.


अकोला शहर बनले विदर्भातील कोरोना हॉटस्पॉट. 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे, लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुद्धा संपत आला असून, कोरोनाचे रुग्ण काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत.  अश्यातच विदर्भातील अकोला शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, आतापर्यंत तब्ब्ल ५०७ रुग्णाची नोंद झाली आहे.  

अकोला : जिल्हात आता पर्यंत ५०७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, तब्ब्ल २८ कोरोना बाधितांचा यात मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्याने नागपूर जिल्ह्याला सुद्धा या मध्ये मागे टाकले आहे. 

अकोला शहर विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' बनलं आहे. विदर्भात कोरोनामुळे आतापर्यंत 57 रूग्णांचे बळी गेलेत. या बळींमध्ये 50 टक्के वाटा एकट्या अकोल्याचा आहे. अकोला शहराचा 90 टक्के भाग सध्या 'कंटेन्मेंट झोन'मध्ये आहे. 

अकोल्यात पहिला रूग्ण 7 एप्रिलला आढळला होता. मात्र, आज नागपूरची रूग्णसंख्या 441 आहे, आणि अकोल्याची रूग्णसंख्या तब्बल 465 वर पोहोचली आहे. नागपूर हे अकोल्याच्या तब्बल पाचपट मोठं शहर आहे. अकोल्याची लोकसंख्या 5 लाख आहे. तर नागपूरची लोकसंख्या 25 लाखांवर आहे.

अकोल्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि वाढते मृत्यू ही मोठी चिंतेची बाब आहे. पुढील काळात अकोल्यावरचं हे संकट दूर करण्यासाठी प्रशासन, आरोग्ययंत्रणा, महापालिका, पोलीस प्रशासन अन् पर्यायानं जनताही जबाबदारीने वागली तरच अकोल्यावरचं कोरोनाचं काळं संकट दूर होऊ शकेल.
Previous Post Next Post