"तंत्रज्ञानाचा वापर करुण नागपुर जिल्यातील शेतकऱ्यांना कपासी पिकाबद्धल मार्गदर्शन"
सध्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होत आहे , त्यातच नागपुर जिल्यातील प्रमुख पिक म्हणून कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केलि जाते ,व शेतकऱ्यांना कापूस पिक लागवड व व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी बरेच प्रश्न होते. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा नागपुर यांनी दिनांक २१/०५/२०२० रोजी नागपुर जिल्यातील ५० शेतकऱ्यांसाठी पिक लागवड व व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. धम्मदीप गोंडाने, रिलायंस फॉउंडेशन नागपुर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व जिल्हा प्रतिनिधि स्वराज कुमरे तसेच श्री.अंकित देशमुख (ग्राम परिवर्तक) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (झमकोली)नागपुर यांनी केले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री.राजेंद्र जाने (माजी कृषि तंत्र) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडी करीता विविध जाती कोणत्या आहे ,कापूस पेरणी पूर्वी कपासची बिज प्रक्रिया कशी करावी व बिज प्रक्रियेचे फायदे कपासिवर येणाऱ्या गुलाबी बोंड अळीचे नियोजन कसे करावे ,कपासी पिकातील खत व्यवस्थापण कसे करावे.तसेच निम्बोळी अर्कचे महत्व कपासीसाठी जामिनीची मशागत कसी करावी,कपासी पिकावरिल खर्च कमी करून जास्त उत्पादन कसे घ्यावे या बद्धल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १३ गावातील ५० शेतकऱ्यांनी या डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्तीत शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.