वर्धा : कोरोनाबाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील सर्व 59 अहवाल निगेटिव्ह



कोरोनाबाधित  व्यक्तींच्या  निकट संपर्कातील सर्व 59 अहवाल निगेटिव्ह

वर्धा, दि 13 :-  हिवरा तांडा आणि वाशीमच्या कोरोना बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व  59 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल आज  निगेटिव्ह आलेत. 

जिल्ह्यात  हिवरा तांडा येथील एका महिलेचा  मृत्यनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.तसेच वाशिम येथील रुग्ण वर्धेत उपचारासाठी आला असताना त्याचाही कोरोना चाचणी  अहवाल  पॉझिटिव्ह आला होता.  या दोन्ही कोरोना बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कात असलेल्या 59 व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी सेवाग्राम महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी काल 41  व्यक्तींचे अहवालात  कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित  18 अहवाल आज प्राप्त झालेत, या सर्व अहवालातही कोणीही कोरोना बाधित नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे  आज वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Previous Post Next Post